सगळ्यांना हसवणारा प्रणीत मोरे पहिल्यांदाच रडला, घरचं पत्र वाचताच अश्रू अनावर
'बिग बॉस'च्या घरात दिवाळीनिमित्त सदस्यांना त्यांच्या प्रिय व्यक्तींकडून पत्रं आली. प्रणीत मोरेसाठी आलेलं पत्र वाचताना तो भावूक झाला आणि रडला. प्रणीतच्या खेळाची, संयमाची आणि मैत्रीची प्रशंसा करणारे हे पत्र नेहल चुडासीमाने त्याला दिलं. प्रणीतच्या विनोदी शैलीमुळे तो घरातील सदस्य आणि महाराष्ट्रातील प्रेक्षकांचं प्रेम मिळवत आहे. त्याला सर्वत्र पाठिंबा मिळत आहे.