Bigg Boss 19 मध्ये होणार वाइल्ड कार्ड एन्ट्री? क्रिकेटपटूची बहीण करणार प्रवेश
'बिग बॉस १९' हा शो प्रेक्षकांचं उत्तम रीतीनं मनोरंजन करीत आहे. स्पर्धकांमधील भांडणं वाढत आहेत आणि तिघे स्पर्धक एलिमिनेट झाले आहेत. आता वाइल्ड कार्ड एन्ट्रीद्वारे दीपक चहरची बहीण मालती चहर येणार असल्याची चर्चा आहे. मालतीच्या एन्ट्रीनं शोचा टीआरपी वाढण्याची शक्यता आहे. घरातील स्पर्धकांमध्ये टास्कवरून वाद सुरूच आहेत, विशेषतः बसीर अली आणि प्रणीत मोरे यांच्यात.