Bigg Boss 19 मधून बाहेर पडताच झीशान कादरीचे अमाल मलिक आणि बसीर अलीवर आरोप; म्हणाला…
'बिग बॉस १९'मध्ये अभिनेता झीशान कादरीचा प्रवास संपला आहे. अशनूर कौर, बसीर अली आणि झीशान हे नॉमिनेट झाले होते, पण झीशान बाहेर पडला. शोमधून बाहेर पडल्यानंतर त्याने अमाल मलिक आणि बसीर अलीने विश्वासघात केल्याचा आरोप केला. झीशानने तान्या मित्तलचं कौतुक केलं आणि शोदरम्यान निर्मात्यांकडून योग्य मार्गदर्शन मिळालं नसल्याचं सांगितलं.