मराठमोळ्या प्रणीत मोरेला अंकिता वालावलकरचा फुल सपोर्ट! बसीर अलीचाही घेतला समाचार, म्हणाली…
'बिग बॉस १९' शोमध्ये बसीर अली आणि प्रणीत मोरे यांच्यात वाद झाला. बसीरने प्रणीतला "Go Back To Your Village" असे म्हणत चिडवले. यावर 'बिग बॉस मराठी ५' मधील स्पर्धक अंकिता वालावलकरने प्रणीतला पाठिंबा दिला आहे. तिने सर्वांना प्रणीतला वोट करण्याचे आवाहन केले. तिच्या नवऱ्यानेही प्रणीतला समर्थन दिले. अंकिताच्या व्हिडिओखाली अनेक नेटकऱ्यांनी प्रणीतला पाठिंबा दर्शवला आहे.