“आमची महादेवी आम्हाला परत द्या”, नांदणीतील हत्तीणीसाठी धनंजय पोवारची भावनिक साद; म्हणाला…
गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर कोल्हापूरच्या नांदणी गावातील महादेवी हत्तीणीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हत्तीणीला गुजरातच्या वनतारामध्ये पाठवताना गावकऱ्यांना अश्रू अनावर झाले. अनेकांनी न्यायालयाच्या निकालावर नाराजी व्यक्त केली आहे. 'बिग बॉस मराठी ५' फेम धनंजय पोवारनेही व्हिडीओ शेअर करत भावनिक प्रतिक्रिया दिली आहे. त्याने सरकारला लोकांच्या भावनांचा विचार करून हत्तीणीला परत आणण्याची विनंती केली आहे.