“अभिनेत्री म्हणून नव्हे, ‘घटस्फोटित’ म्हणून ‘बिग बॉस’मध्ये घेतलं”, अभिनेत्रीचं वक्तव्य
अभिनेत्री डेलनाज ईराणी 'बिग बॉस'च्या सहाव्या सीझनमध्ये सहभागी झाल्या होत्या. त्यांनी सांगितलं की, हा शो करण्यामागे त्यांचा एकच हेतू होता, तो म्हणजे पैसे कमावणे. शोमध्ये प्रवेश करताच त्यांना कळलं की, त्यांना त्यांच्या टॅलेंटसाठी नव्हे तर घटस्फोटामुळे बोलावलं गेलं आहे. डेलनाज यांनी ठरवलं होतं की, शोमध्ये १४ आठवडे टिकायचं आणि खोटी भांडणं न करता आपलं काम करायचं.