“म्हणून मी नकारात्मक भूमिका करत आहे”, ‘देवमाणूस’ फेम किरण गायकवाडची प्रतिक्रिया; म्हणाला…
अभिनेता किरण गायकवाड 'देवमाणूस - मधला अध्याय' मालिकेत मुख्य भूमिकेत आहे. मालिकेतील त्याचं अजित कुमार हे नकारात्मक पात्र प्रेक्षकांनी चांगलंच स्वीकारलं आहे. झी मराठी पुरस्कार २०२५ च्या नामांकन सोहळ्यात किरणने या भूमिकेबद्दल प्रतिक्रिया दिली. त्याने सांगितलं की, २०१७ पासून झी मराठीवर काम करत असून, नकारात्मक भूमिका त्याच्या नशिबातच आहे असं वाटतं. पुरस्कारांबद्दल त्याचं मत आहे की, कामच खरा पुरस्कार आहे.