‘देवमाणूस’मधून लोकप्रिय अभिनेत्रीची होणार एक्झिट, शेअर केली भावुक पोस्ट; म्हणाली…
लोकप्रिय मराठी मालिका 'देवमाणूस - मधला अध्याय'मधील अभिनेत्री एकता डांगरने भावुक पोस्ट शेअर करत मालिकेचा निरोप घेणार असल्याचं म्हटलं आहे. तिने गंगा हे पात्र साकारत प्रेक्षकांची पसंती मिळवली होती. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तिने गंगाचा शेवटचा संवाद सादर केला आहे. 'देवमाणूस'पूर्वी एकता 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिकेत झळकली होती. आता ती कोणत्या नवीन भूमिकेत दिसणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.