मराठी अभिनेत्रीने लग्नानंतर पहिल्यांदाच साजरी केली वटपौर्णिमा, शेअर केला खास व्हिडीओ
मराठी मनोरंजन विश्वातील अनेक अभिनेत्रींनी साजऱ्या केलेल्या आजच्या वटपौर्णिमेचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अभिनेत्री धनश्री काडगांवकरनेही वटपौर्णिमा साजरी केली असून तिच्या सोशल मीडियावर याची झलक शेअर केली आहे. यासोबत धनश्रीने पोस्ट शेअर केली आहे आणि पोस्टमधून तिने असं सांगितले की, लग्नानंतरची ही तिची पहिलीच वटपौर्णिमा आहे. दरम्यान, तिच्या या व्हिडीओला चाहत्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.