‘लक्ष्मी निवास’फेम दिव्या पुगावकरने सांगितला सासू-सासऱ्यांचा किस्सा, म्हणाली…
अभिनेत्री दिव्या पुगावकरने 'मुलगी झाली हो' मालिकेतून मराठी मालिकाविश्वात पदार्पण केलं आणि सध्या 'लक्ष्मी निवास'मध्ये जान्हवीची भूमिका साकारत आहे. तिने फेब्रुवारी २०२५ मध्ये प्रियकर अक्षय घरतसह लग्न केलं. 'झी मराठी'च्या आंबा महोत्सवात दिव्या व मेघन जाधव यांनी 'लोकमत फिल्मी'ला मुलाखत दिली. दिव्याने तिच्या सासू-सासऱ्यांच्या प्रेमळ वागणुकीबद्दल यामध्ये सांगितलं.