“खूप त्रासदायक…”, घटस्फोटाबाबत प्रसिद्ध अभिनेत्रीने सोडलं मौन; म्हणाली, “माझं आयुष्य…”
'बिग बॉस' फेम अभिनेत्री ऐश्वर्या शर्मा आणि नील भट्ट यांच्या घटस्फोटाच्या अफवांवर ऐश्वर्याने सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली आहे. तिने इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करत अफवा पसरवणाऱ्यांना थांबवण्याचे आवाहन केले आहे. ऐश्वर्या म्हणाली की, ती शांत आहे याचा अर्थ ती कमजोर नाही. तिने कोणत्याही मुलाखतीत घटस्फोटाबद्दल बोलेलं नसल्याचे स्पष्ट केले. ऐश्वर्या आणि नील यांनी २०२१ मध्ये लग्न केले होते.