लोकप्रिय मराठमोळी गायिका लवकरच होणार आई! लग्नानंतर तीन वर्षांनी दिली खुशखबर
'इंडियन आयडल' फेम मराठी गायिका सायली कांबळेने सोशल मीडियावरून आई होणार असल्याची आनंदाची बातमी शेअर केली आहे. तिने डोहाळे जेवणाच्या सोहळ्यातील फोटो पोस्ट केले असून, पारंपरिक लूकमध्ये दिसत आहे. सायलीने पती धवलसोबतचा फोटो शेअर करत, त्यांच्या आयुष्यात लवकरच एक छोटा पाहुणा येणार असल्याचे सांगितले. चाहत्यांनी आणि 'इंडियन आयडल'मधील मित्रांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.