जान्हवी किल्लेकरची ‘या’ मालिकेत एन्ट्री; अभिनेत्रीच्या लूकने वेधलं लक्ष, पाहा प्रोमो
मराठी मालिकाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री जान्हवी किल्लेकर 'कलर्स मराठी' वाहिनीवरील 'आई तुळजाभवानी' या पौराणिक मालिकेतून मोहिनी या खलनायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. 'बिग बॉस'मधून चर्चेत आलेली जान्हवी याआधी 'भाग्य दिले तू मला' आणि 'अबोली' मालिकांमध्ये झळकली होती. तिच्या नव्या लूकने प्रेक्षकांचे लक्ष वेधले असून, चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.