दिन दिन दिवाळी! ‘काजळमाया’ फेम लोकप्रिय अभिनेत्याने ‘असा’ साजरा केला पहिला दिवाळ सण
अभिनेता अक्षय केळकरने यंदा त्याचा पहिला दिवाळसण साजरा केला. त्याने सोशल मीडियावर पत्नी साधना काकतकरसोबत साजरा केलेल्या दिवाळीच्या क्षणांचे व्हिडीओ शेअर केले. व्हिडीओमध्ये अक्षय सजावटीसाठी मदत करताना, फराळाचा आनंद घेताना आणि फुलबाजे पेटवताना दिसतो. अक्षयने ९ मे रोजी साधनाशी लग्न केले होते. तो 'बिग बॉस मराठी' आणि 'काजळमाया' यांसारख्या शोमध्ये दिसला आहे.