कपिल शर्माला धमकी देणाऱ्या आरोपीला पश्चिम बंगालमधून अटक, पोलिसांनी दिली ‘ही’ माहिती
लोकप्रिय विनोदी कलाकार कपिल शर्मा चर्चेत आहे कारण त्याच्या कॅनडातील कॅफेवर गोळीबार झाला होता. लॉरेन्स बिश्नोई टोळीने जबाबदारी घेतली आणि कपिलला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. मुंबई क्राईम ब्रँचनं धमकी देणाऱ्या दिलीप चौधरीला पश्चिम बंगालमधून अटक केली. चौधरीने कुख्यात गुंडांच्या नावाने कपिलला धमक्या दिल्या होत्या. आता त्याला पुढील चौकशीसाठी मुंबईत आणलं जात आहे.