KBC मध्ये विचारला गेला मराठमोळ्या त्रिशा ठोसरबद्दल प्रश्न; तुम्हाला माहितीय का उत्तर?
‘कौन बनेगा करोडपती’ हा लोकप्रिय टीव्ही शो गेल्या २५ वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या शोमध्ये विविध क्षेत्रांतील प्रश्न विचारले जातात. अलीकडेच, सहा वर्षांची मराठमोळी त्रिशा ठोसर हिच्याबद्दलचा प्रश्न विचारण्यात आला. रचित उप्पल यांनी 'प्रेक्षक पोल' लाईफलाईन वापरून योग्य उत्तर दिले आणि २५ लाख रुपये जिंकले. त्रिशाला 'नाळ २'साठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला असून ती लवकरच 'पुन्हा शिवाजी राजे भोसले' या सिनेमात दिसणार आहे.