यश-अमृताच्या लग्नासाठी माँने कावेरीकडून घेतलं वचन, सून म्हणूनही स्वीकार करणार पण..
स्टार प्रवाहवरील 'कोण होतीस तू काय झालीस तू' ही मालिका प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन करत आहे. मालिकेत अमृता (रेवती लेले) या नवीन पात्राची एन्ट्री झाली आहे, जी यशची बालमैत्रीण आहे. यश आणि कावेरीची लव्हस्टोरी सुरू होणार होती, पण अमृताच्या येण्याने ती थांबली. माँने यश-अमृताच्या लग्नाचा निर्णय घेतल्यामुळे कावेरी घर सोडणार होती, पण चिकूवर आलेल्या संकटामुळे ती थांबली. माँने कावेरीकडून यश-अमृताच्या लग्नाचं वचन घेतलं आहे.