‘क्यूंकी सास भी कभी बहू थी’च्या दुसऱ्या पर्वात झळकणार स्मृती इराणी?
राजकारणी आणि अभिनेत्री स्मृती इराणी एकेकाळी 'क्यूंकी सास भी कभी बहू थी' या लोकप्रिय मालिकेत झळकल्या होत्या. नुकतीच या मालिकेला २५ वर्षे पूर्ण झाली असून निर्माती एकता कपूरने दुसऱ्या पर्वाची घोषणा केली आहे. स्मृती इराणी यांनी या पर्वासाठी करार केला असल्याचं म्हटलं जात आहे. मालिकेचं दुसरं पर्व ओटीटीवर प्रसारित होणार असून स्मृती इराणी मुख्य भूमिकेत असण्याची शक्यता वर्तवली जाती आहे.