“तू एक जादूचं जग मला दाखवलंस…”, ‘लक्ष्मी निवास’ फेम अभिनेत्रीची नवऱ्यासाठी खास पोस्ट
झी मराठीवरील 'चला हवा येऊ द्या' शोचा दुसरा सीझन नुकताच सुरू झाला आहे. या शोमधील संगीत संयोजक तुषार देवलचा आज वाढदिवस आहे. त्याच्या पत्नी स्वाती देवलने इन्स्टाग्रामवर एक खास पोस्ट शेअर करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. स्वाती सध्या 'लक्ष्मी निवास' मालिकेत 'मंगला'ची भूमिका साकारत आहे आणि लवकरच 'मनपसंद की शादी' या हिंदी मालिकेतही दिसणार आहे.