‘लालबागचा राजा’ मंडळाच्या नियोजनाबद्दल अभिज्ञा भावेच्या नवऱ्याची पोस्ट, म्हणाला…
गणेशोत्सवाच्या अनंत चतुर्दशीला लालबागच्या राजाच्या विसर्जन प्रक्रियेत झालेल्या दिरंगाईबद्दल अभिज्ञा भावेच्या पतीने नाराजी व्यक्त केली आहे. मेहुल पैने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर मंडळाच्या व्यवस्थापनावर टीका केली आहे. त्याने व्हीआयपी लोकांना प्राधान्य देणे आणि सामान्य भक्तांना अपमानित करणे यावर रोष व्यक्त केला. कोळी बांधवांच्या मदतीनेच विसर्जन पूर्ण झाल्याचेही त्याने नमूद केले.