अभिनेता अनुज प्रभूने सांगितला ‘धर्मवीर’ चित्रपटात राज ठाकरेंची भूमिका साकारण्याचा अनुभव
प्रवीण तरडे दिग्दर्शित 'धर्मवीर' चित्रपट प्रदर्शित झाल्यावर प्रेक्षकांनी तुडुंब गर्दी केली होती. आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटात प्रसाद ओकने त्यांची भूमिका साकारली होती. राज ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या भेटीचे दृश्य विशेष गाजले. अभिनेता अनुज प्रभूने राज ठाकरेंची भूमिका साकारली होती. 'धर्मवीर'मुळे अनुजच्या करिअरला गती मिळाली. सध्या तो 'लक्ष्मी निवास' मालिकेत विश्वा ही भूमिका साकारत आहे.