“आमच्या ‘हमरेको तुमरेको’मुळे समाज अचानक…”, समीर चौघुले हिंदी सक्तीसंदर्भात स्पष्टच बोलले
राज्य मंडळाच्या शाळांमध्ये पहिली ते पाचवीपर्यंत हिंदी तिसरी भाषा म्हणून शिकवली जाणार आहे. यावर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम समीर चौघुले यांनी हिंदीची सक्ती नको, असे मत व्यक्त केले आहे. त्यांनी मराठीचा अभिमान बाळगण्याचे आवाहन केले. एका युजरने इंग्रजीची सक्तीही नको, असे मत मांडले. अनेकांनी मराठी कलाकारांनी परखड भूमिका मांडल्याचे कौतुक केले.