चिमुकल्यांसह फोटो, गरबा डान्स अन्…; प्रभाकर मोरेंच्या साधेपणाने जिंकली मनं, चाहते म्हणाले
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय शोमधील विनोदी कलाकार प्रभाकर मोरे यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. नवरात्रीच्या उत्सवात डोंबिवलीत झालेल्या कार्यक्रमात त्यांनी सहभाग घेतला आणि सोशल मीडियावर फोटो-व्हिडीओ शेअर केले. चाहत्यांबरोबर गरबा नृत्य करताना आणि फोटो काढताना त्यांना पाहून चाहत्यांनी त्यांचं साधेपण कौतुकास्पद मानलं. प्रभाकर मोरे काही चित्रपटांमधूनही प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत.