रस्त्याच्या दुरवस्थेबाबत आस्ताद काळेचा पुन्हा संताप; म्हणाला, “आमच्या आयुष्याची किंमत…”
मराठी इंडस्ट्रीतील अभिनेता आस्ताद काळेने ठाणे-मुंबई रस्त्यावरील खड्डे आणि ब्रिजवरील दिव्यांच्या अभावाबद्दल प्रशासनावर टीका केली आहे. सोशल मीडियावर व्हिडीओद्वारे त्याने नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांना प्रश्न विचारले. आस्तादने रस्त्यावरील खड्डे, अर्धवट बांधकामे आणि ब्रिजवरील दिव्यांच्या अभावामुळे होणाऱ्या त्रासाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.