Video : ‘नटीनं मारली मिठी’ गाण्यावर मराठी अभिनेत्याचा भन्नाट डान्स, चाहत्यांनी केलं कौतुक
अलीकडे सोशल मीडियावर 'नटीनं मारली मिठी' हे गाणं ट्रेंडिंगमध्ये आहे. मराठी अभिनेता अजिंक्य राऊतने या गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. शूटिंगच्या मोकळ्या वेळेत केलेल्या या डान्सला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. अजिंक्यने 'विठू माऊली' आणि 'मन उडू उडू झालं' मालिकांमधून लोकप्रियता मिळवली आहे. त्याचे डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.