स्वत:च्या मूळ गावी पोहोचला संकर्षण कऱ्हाडे, अंबाजोगाई देवीचं घेतलं दर्शन, आठवण केली शेअर
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने अंबाजोगाई गावातील देवीचं आणि घरच्या मारूती रायाचं दर्शन घेतलं. त्याने सोशल मीडियावर फोटो शेअर करत बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. लहानपणी देवीच्या मंदिरातील गणपतीला चिकटवलेल्या गव्हाच्या आठवणी सांगितल्या. त्याच्या या पोस्टला चाहत्यांनी चांगला प्रतिसाद दिला असून, अनेकांनी त्याच्या गावच्या आठवणींवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.