“कृपया नवरात्रौत्सवाच्या शुभेच्छा देऊ नका”, मराठी अभिनेत्री स्पष्टच बोलली
देशभरात शारदीय नवरात्री उत्सवाला सुरुवात झाली आहे. या नऊ दिवसांत देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते आणि गरबा-दांडियांचे आयोजन होते. स्त्रीशक्तीचा जागर होत असून, कर्तृत्ववान महिलांचा सन्मान केला जातो. मराठी अभिनेत्री अपूर्वा गोरे हिनं सोशल मीडियावर पुरुषांसाठी पोस्ट शेअर करत, स्त्रियांना त्रास देणाऱ्यांनी नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा देऊ नयेत, असं म्हटलं आहे. अपूर्वा 'आई कुठे काय करते' मालिकेत ईशा म्हणून ओळखली जाते.