मराठी अभिनेत्री करतेय पंढरपूरच्या वारकऱ्यांची सेवा, ‘त्या’ कृतीने वेधलं लक्ष; पाहा व्हिडीओ
पंढरपूरची वारी ही महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाची पवित्र यात्रा आहे. यंदाच्या वारीत अभिनेत्री कश्मिरा कुलकर्णी सहभागी झाली आहे. तिने वारकऱ्यांच्या पायांची मालिश केली आणि खाऊवाटप केले. कश्मिराने तिच्या सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत "विठ्ठलाच्या पायी झाले भाग्यवंत" असे म्हटले आहे. तिच्या या सेवाभावी कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.