“तो जवळ येण्याचा प्रयत्न करत होता अन्…” मराठी अभिनेत्रीला आलेला वाईट अनुभव; म्हणाली…
मराठी अभिनेत्री सुरभी भावे हिने मनोरंजन क्षेत्रातील वाईट अनुभवांबद्दल सांगितले. एका शूटिंगच्या वेळी वाईट नजरेने पाहणाऱ्या अभिनेत्याला तिने थेट उत्तर दिले. दुसऱ्या प्रसंगात, एक सहाय्यक दिग्दर्शक वारंवार जवळ येण्याचा प्रयत्न करत होता, त्याला तिने स्पष्टपणे दूर राहण्यास सांगितले. सुरभीने 'भाग्य दिले तू मला', 'स्वामिनी', 'राणी मी होणार', 'सख्या रे' आणि 'तू ही रे माझा मितवा' या मालिकांमध्ये काम केले आहे.