श्रीकृष्णाच्या गाण्यावर मराठी अभिनेत्रींनी सादर केलं मनमोहक नृत्य, चाहत्यांकडूनही कौतुक
दहीहंडी आणि श्रीकृष्णजन्माष्टमीच्या निमित्ताने राज्यभरात उत्साहाचं वातावरण आहे. 'नवरी मिळे हिटलरला' मालिकेतील अभिनेत्री वल्लरी विराज आणि आलापिनी निसळ यांनी 'शुभमंगल सावधान' सिनेमातील 'कान्हा' गाण्यावर सुंदर नृत्य सादर केलं आहे. त्यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला असून, चाहत्यांनी त्यांचं कौतुक केलं आहे. वल्लरी आणि आलापिनी या सोशल मीडियावर सक्रिय असून, त्यांच्या नृत्याचे व्हिडीओ शेअर करत असतात.