व्यवसाय, पेंटिंग, अभिनय अन्…; मेघा धाडेची लेक लहान वयात करतेय ‘इतक्या’ गोष्टी, म्हणाली…
अभिनेत्री मेघा धाडे 'सावळ्याची जणू सावली' मालिकेत खलनायिकेच्या भूमिकेत दिसत आहे. तिची मुलगी साक्षी पावसकर लवकरच अभिनयक्षेत्रात पदार्पण करणार आहे. साक्षीने फिल्म प्रॉडक्शन आणि अनुपम खेर अॅक्टर्स प्रीपेअर्समधून अभिनयाचं शिक्षण घेतलं आहे. तिला पेंटिंग आणि बेकिंगचीही आवड आहे. मेघाच्या मते, साक्षीने कुटुंबाचा व्यवसाय उत्तम प्रकारे सांभाळला आहे, पण आता ती पुन्हा अभिनयाकडे वळली आहे.