“वडील ओपन कॅटेगरीतले असल्यामुळे…”, मिलिंद गवळींची पोस्ट चर्चेत; म्हणाले, “प्रामाणिक काम…”
मराठी मनोरंजन क्षेत्रातील लोकप्रिय अभिनेता मिलिंद गवळी यांनी आपल्या वडिलांबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांच्या वडिलांनी पोलिस खात्यात ३७ वर्षं प्रामाणिकपणे सेवा दिली. निवृत्तीनंतरही त्यांनी अनेक केसेस कोर्टात चालवल्या. मिलिंद यांनी वडिलांवर झालेल्या अन्यायाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. त्यांनी वडिलांच्या प्रामाणिकपणाचं कौतुक केलं आणि त्यांच्या कष्टांमुळे पुढच्या पिढीला चांगलं भविष्य मिळालं असं म्हटलं.