रमा-अक्षय येणार एकत्र, ७ वर्षांनंतर पुन्हा होईल का त्यांचं मनोमिलन? ‘मुरांबा’मध्ये ट्विस्ट
'मुरांबा' मालिकेने सात वर्षांचा लिप घेतल्यानंतर रमा आणि अक्षयमध्ये दुरावा निर्माण झाला आहे. नवीन प्रोमोमध्ये लिपनंतर पहिल्यांदाच रमा आणि अक्षय एकत्र आले आहेत. आरोही स्पर्धेसाठी तिच्या वडिलांची वाट पाहत असते, पण अक्षय ट्रॅफिकमध्ये अडकतो. रमा आरोहीला मदत करते आणि स्पर्धेत धावते. शेवटी, अक्षय आणि रमा सात वर्षांनंतर एकमेकांना पाहतात. आता ते लेकीसाठी एकत्र येतील का हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.