Video : मन तळ्यात… मळ्यात…; लोकप्रिय गाण्यावर मराठी अभिनेत्रींचं सुंदर नृत्य सादरीकरण
मराठी इंडस्ट्रीतील अभिनेत्री वल्लरी विराज आणि आलापिनी निसळ यांनी सोशल मीडियावर एक डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. 'नवरी मिळे हिटलरला' मालिकेतून प्रसिद्ध झालेल्या या जोडीने संदीप खरे यांच्या 'मन तळ्यात… मळ्यात…' गाण्यावर सुंदर सादरीकरण केले आहे. या व्हिडीओमध्ये वल्लरी डेटवर जाण्यासाठी तयार होताना दिसते, तर आलापिनी तिला तयार करत आहे. चाहत्यांसह अनेक कलाकारांनी त्यांच्या सादरीकरणाचे कौतुक केले आहे.