दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर लोकप्रिय अभिनेत्रीनं घेतली आलिशान कार; अमृता खानविलकर म्हणाली…
टीव्ही अभिनेत्री निया शर्माने दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर Mercedes AMG CLE 53 ही आलिशान कार खरेदी केली आहे. तिने सोशल मीडियावर गाडीचे फोटो शेअर करत चाहत्यांना ही बातमी दिली. तिच्या कार कलेक्शनमध्ये Volvo XC90, Audi Q7 आणि Audi A4 यांचा समावेश आहे. अनेक कलाकारांनी आणि चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. निया सोशल मीडियावर सक्रिय असून तिच्या लक्झरी लाइफस्टाईलचे फोटो-व्हिडीओ शेअर करते.