‘पंचायत’ फेम अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका, रुग्णालयात उपचार सुरू; आता कशी आहे प्रकृती?
'पंचायत' या वेब सीरिजच्या चौथ्या सीझनची सध्या ओटीटी पविश्वात चर्चा आहे. या सीरिजमधील अभिनेता आसिफ खानला दोन दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. त्याला मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या त्याची प्रकृती सुधारत आहे. आसिफने इन्स्टाग्रामवरून आपल्या चाहत्यांचे आभार मानले आहेत. 'पंचायत' आणि 'पाताल लोक' या सीरिजमधील भूमिकांमुळे तो प्रसिद्ध झाला आहे.