‘पिंगा गं पोरी पिंगा’ मालिकेतील अभिनेत्रीच्या पायाला दुखापत, मैत्रिणीने शेअर केला व्हिडीओ
लोकप्रिय मराठी अभिनेत्री ऐश्वर्या शेटे, 'पिंगा गं पोरी पिंगा' मालिकेत वल्लरीची भूमिका साकारत आहे. नुकताच तिच्या पायाला फ्रॅक्चर झालं असूनही ती शूटिंग करत आहे. तिची सहअभिनेत्री विदिशा म्हसकरने सोशल मीडियावर ऐश्वर्याच्या दुखापतीचा व्हिडीओ शेअर केला आहे. विदिशा आणि ऐश्वर्या मालिकेत आणि खऱ्या आयुष्यातही चांगल्या मैत्रिणी आहेत. मालिकेत त्यांच्या मैत्रीची गोष्ट प्रेक्षकांना पाहायला मिळते.