ठरलं तर मग! प्राजक्ता गायकवाड ‘या’ शुभ मुहूर्तावर अडकणार लग्नबंधनात, खास आमंत्रण
'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेत महाराणी येसूबाईंची भूमिका साकारून लोकप्रिय झालेली अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. तिने सोशल मीडियावर लग्नाची तारीख २ डिसेंबर २०२५ जाहीर केली आहे. प्राजक्ताने तिच्या लग्नपत्रिका पूजनाचा व्हिडीओ शेअर केला असून, तिच्या चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. प्राजक्ता आणि शंभुराज खुटवड यांचा साखरपुडा ७ ऑगस्ट २०२५ रोजी झाला होता.