“एकमेकांचा ईगो हर्ट होऊनही…”, ‘प्रेमाची गोष्ट’मधील अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत; म्हणाली…
स्टार प्रवाहवरील 'प्रेमाची गोष्ट' ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. मालिकेतील मुक्ता-सागरसह सर्व पात्रांनी प्रेक्षकांना आपलंसं केलं आहे. अभिनेत्री अमृता बनेने तिच्या आई-वडिलांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. तिने त्यांच्या नात्याबद्दल आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.