महागड्या गाड्या, मोठं घरं अन्…, राम कपूर आहे कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक
अभिनेता राम कपूर 'बडे अच्छे लगते हैं' या मालिकेतून प्रसिद्ध झाला. टेलिव्हिजनवरील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांपैकी एक असलेल्या रामने नुकत्याच एका मुलाखतीत सांगितले की, त्याच्याकडे इतका पैसा आहे की पुढच्या चार पिढ्यांना उपयोगी पडेल. गाड्यांची आवड असलेल्या रामने लॅम्बोर्गिनी खरेदी केली होती. राम, रोनित रॉय आणि साक्षी तन्वर यांनी २० वर्षे टेलिव्हिजनसाठी काम करून मोठी संपत्ती कमावली आहे.