Video : आम्ही कांचो…; गाण्यावर स्टार प्रवाहच्या अभिनेत्रींचा धमाल व्हिडीओ,
मराठी टीव्ही अभिनेत्रींचा डान्स व्हिडीओ: मराठी अभिनेते आणि अभिनेत्री सोशल मीडियावर सक्रिय असतात आणि त्यांच्या फोटो-व्हिडीओला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळतो. स्टार प्रवाहवरील 'तू ही रे माझा मितवा' मालिकेतील अभिनेत्री रुपल नंद, सुरभी भावे आणि स्वाती चिटणीस यांनी 'नवरा माझा नवसाचा' चित्रपटातील 'आम्ही कांचो' गाण्यावर अतरंगी डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला चाहत्यांसह कलाकारांनीही चांगला प्रतिसाद दिला आहे. मालिकेत वाद असले तरी ऑफस्क्रीन त्यांचा बॉण्ड छान आहे.