मालिकेतील सीनसाठी समीर परांजपेने स्वत:च्या आवाजात गायलं गाणं, व्हिडीओ शेअर करत म्हणाला…
कलर्स मराठीवरील 'सुंदरा मनामध्ये भरली' मालिकेतून प्रसिद्ध झालेला अभिनेता समीर परांजपे हा अभिनेता असण्याबरोबरच उत्तम गायकही आहे. 'सुर नवा, ध्यास नवा' शोमधील गायकीद्वारे त्याने श्रोत्यांची मनं जिंकली. सध्या तो 'थोडं तुझं आणि थोडं माझं' मालिकेत तेजसची भूमिका साकारत आहे. या मालिकेतील एका सीनसाठी समीरने 'तोच चंद्रमा नभात' हे गाणं गायले असून यानिमित्तचा आनंद त्याने व्यक्त केला आहे. याबद्दल चाहत्यांनी त्याच्या गायकीचे कौतुक केले आहे.