“तुझी मुलं आणि नवरा…”, सुलेखा तळवलकर यांना सासुबाईंनी दिलेला मोलाचा सल्ला; म्हणाल्या…
सुलेखा तळवलकर मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. यांनी नुकतीच 'लोकमत फिल्मी'ला मुलाखत दिली. यामध्ये त्यांनी त्यांच्या सासुबाई दिवंगत अभिनेत्री स्मिता तळवलकर यांच्याबद्दल सांगितलं. स्मिता तळवलकर यांनी सुलेखा यांना दिलेला सल्ला आणि त्यांचे संस्कार याबद्दल सुलेखा बोलल्या आहेत. त्यांनी स्मिता तळवलकर यांचं आयुष्य, त्यांचं प्रेम आणि मार्गदर्शन याबद्दल आठवणींना उजाळा दिला.