“टेस्ला आणलीत! रस्ते आणि शिस्त केव्हा आणाल?”, शशांक केतकरची पोस्ट चर्चेत; म्हणाला…
अभिनेता शशांक केतकर सोशल मीडियावर सक्रिय असून, त्याने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये शशांकने भारतात लॉंच झालेल्या टेस्ला गाडीबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. त्याने रस्त्यांवरील खड्ड्यांवरून टेस्ला जात असल्याचे दाखवले आहे. शशांक नेहमीच त्याच्या परिसरातील व्हिडीओ आणि फोटो शेअर करत असतो. सध्या तो 'मुरांबा' मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे.