“भारतात माणसाचं आयुष्य आणि जगणं अत्यंत स्वस्त”, शशांक केतकर का संतापला? व्हिडीओ केला शेअर
अभिनेता शशांक केतकर सोशल मीडियावर सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवर व्हिडीओ शेअर करत असतो. नुकताच त्याने ठाण्यातील वसंत विहार सोसायटीसमोर चुकीच्या पद्धतीने पार्किंग केलेल्या गाडीबद्दल संताप व्यक्त केला. शशांकने म्हटलं की, अशा बेजबाबदार पार्किंगमुळे लोकांना त्रास होतो आणि जीव धोक्यात येतो. त्याच्या या व्हिडीओला अनेकांनी पाठिंबा दिला आहे.