पोलिसांची व्हॅन गंजलेल्या नंबरप्लेटसह रस्त्यावर…; शशांक केतकरने शेअर केला व्हिडीओ
लोकप्रिय अभिनेता शशांक केतकरने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यात त्याने नंबरप्लेट खराब असलेल्या पोलिसांच्या गाडीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. शशांकने म्हटले की, आरटीओचे नियम सर्वांसाठी सारखेच असतात आणि न्यायदेवतेपुढे कोणीही लहान-मोठं नसतं. त्याने विचारले की, सरकारी गाड्यांना चलान लागतं का आणि ते भरलं जातं का? या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.