याला म्हणतात आजीचं प्रेम! शिव ठाकरेच्या वाढदिवशी आजीने काढली लाडक्या नातवाची दृष्ट
मराठी आणि हिंदी मनोरंजन विश्वात प्रसिद्ध असलेला शिव ठाकरे आपल्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर चर्चेत आहे. त्याने आपल्या आजीबरोबरचा एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. शिवने अनेक रिअॅलिटी शोमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे आणि त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. वाढदिवसानिमित्त त्याच्या घरच्यांनी त्याचं औक्षण केलं असून, शिवने हे खास क्षण इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत.