शिवानी सोनारने सांगितली ‘तारिणी’मागची मेहनत; नवऱ्याच्या प्रतिक्रियेबद्दल म्हणाली…
झी मराठी वाहिनीवर 'वीण दोघांतली तुटेना' आणि 'तारिणी' या दोन नव्या मालिका सुरू होत आहेत. 'तारिणी' मालिकेत शिवानी सोनार आणि स्वराज नागरगोजे मुख्य भूमिकेत आहेत. प्रमोशनदरम्यान शिवानीने तिच्या अनुभवांबद्दल सांगितले. तिच्या नवऱ्याला प्रोमो खूप आवडला आणि त्याने तिला सांभाळून काम करण्याचा सल्ला दिला. शिवानीच्या कुटुंबातील सर्वजण मालिकेसाठी उत्सुक आहेत.