‘शुभविवाह’ फेम ‘या’ लोकप्रिय अभिनेत्रीने दिली गुड न्यूज; लवकरच होणार आई, पाहा फोटो…
'शुभविवाह' मालिकेतील अभिनेत्री कुंजिका काळविंट लवकरच आई होणार आहे. नुकताच तिचा डोहाळजेवणाचा कार्यक्रम पार पडला असून, तिचा नवरा निखिल काळविंटही उपस्थित होता. कुंजिका आणि निखिल यांच्या लग्नाला १० वर्षं पूर्ण झाली आहेत. कुंजिका 'शुभविवाह' मालिकेत पूर्णिमा ही भूमिका साकारते. ती सोशल मीडियावर सक्रिय असून, सेटवरील गमती जमती आणि सहकलाकारांबरोबरचे रील्स शेअर करते.