“हा पूर्णविराम नाही…”, मालिका संपताच अभिनेत्रीने शेअर केली भावुक पोस्ट; आज होणार शेवट
स्टार प्रवाह वाहिनीवर 'थोडं तुझं आणि थोडं माझं' ही मालिका आज, १२ सप्टेंबर रोजी संपणार आहे. या मालिकेत शिवानी सुर्वे आणि समीर परांजपे मुख्य भूमिकेत होते. अभिनेत्री सखी गुंडेयने सोशल मीडियावर भावूक पोस्ट शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. मालिकेच्या चाहत्यांनी मालिकेच्या समाप्तीवर नाराजी व्यक्त केली आहे. लवकरच 'लपंडाव' आणि 'नशीबवान' या दोन नव्या मालिका सुरू होणार आहेत.